खानसाहेब म्हणतात त्यात थोडेफार तथ्य आहे. प्रेमें आलंगिन, भावें ओवाळिन, केला जरी पोत बळेंच खाले वगैरे वाक्यांत तृतीय विभक्तीतले शब्द क्रियाविशेषणे आहेत. रिकाम्या जमिनीवर घर बांधले तर, 'आम्ही नवे घर बांधले' आणि जुने घर पाडून पुन्हा बांधले तर 'आम्ही घर नवें बांधले' अशी वाक्यरचना होते. त्यामुळे, निदान गद्य रचनेत, क्रियापदाच्या आधी येणारा एंकारान्‍त शब्द बहुधा क्रियाविशेषण असतो. 'फिरुनी नवें जन्मेन मी'मध्ये असेच झाले आहे.