चालणे हे खूप पूर्वी एक फॅड वाटायचे. सकाळी सकाळी सर्व सरंजामानिशी आपापल्या कुत्र्यांना चालवायला आणि इतर कामांसाठी घेऊन निघालेल्या सरंजामदार लोकांना बघून असेल कदाचित, पण चालणाऱ्यांविषयी एक टिंगलखोर भावना मनात जमून राहिली होती. इतकी की 'चल चल चंद्रा पसर चांदणे', 'चली चली रे पतंगा'  इतकेच काय, पण 'चलो दिलदार चलो' सारख्या संथ गाण्यातही चालण्याच्या द्विरुक्तीमुळे उगीचच घाई केल्यासारखे वाटायचे. पण नंतर आयुष्याने वेग घेतला आणि चालण्यानेही. अनेक चलने-वलने झाली. आता कुठल्याही ठिकाणी गेल्यावर तिथले रस्ते आणि पायवाटा मन ओढून नेतात.

कांदळकरभाऊ, कोल्हापूर कसे निसटले तुमच्या यादीतून?  पन्हाळा,टेंबलाई, रंकाळा, गेला बाजार ताराराणी विद्यापीठ...  हवाही कोरडी.

बाकी लेख दीर्घ तरी छानच. उजव्या भुवईला चटका! हा हा. सलिलछाप गाणी? तुमचे आमचे जमलेच!

एक छोटासा मतभेद. समोसा, वडा, चहा ह्या काय चापायच्या गोष्टी झाल्या? चापणे कसे दणदणीत हवे. मुळात न्याहारी (छोटी हाज़री) हा प्रकार 'चापणे' या कॅटेगरी'त येतो किंवा कसे, हा एक उपमतभेदाचा मुद्दा. 

छान. चलते रहो चौकसभाय...