आनंद मिळाला ही कविता वाचून. काटदऱ्यांच्या प्रतिभेच्या या असामान्य अविष्कारामुळें अक्षरशः स्तिमित झालों. यांचें नांव बहुधा मीं गणपतीपुळ्यापासून केवळ २ किमी वर असलेल्या मालगुंडला केशवसुतांच्या स्मारकांत वाचल्याचें आठवतें. तिथें एकेका कवीचें रेखाचित्र आणि त्याखालीं त्यांच्या निवडक कविता आहेत. काव्यरसिकांसाठीं ती एक पंढरीच आहे. प्रत्येक मराठी साहित्यप्रेमीनें आयुष्यांत निदान एकदां तरी तिथें निवांत वेळ काढून जायला पाहिजे. घरांतली मंडळी पुन्हां कधीं गणेशदर्शनाला गणपतीपुळ्याला गेली नाहीं तर मी एकटा मालगुंडला मात्र निवांतपणें जाणार आहे. कारण कविता डोक्यांत शिरायला मला वेळ लागतो.
असो. बरेंच पाल्हाळ लावलें मीं. उत्तमांतलें उत्तम जाणण्याच्या आणि वेचण्याच्या आपल्या प्रतिभेला त्रिवार सलाम. मालिकेंत पुन्हां एक मस्त जमलेला अप्रतिम लेख. धन्यवाद.
सुधीर कांदळकर