अजानुकर्णासारखेच म्हणते, जिव्हाळ्याच्या विषयावरचा सुंदर लेख..
२/३ तास निरुद्देश चालणे हा आमचा इथला आवडता उद्योग.. फ्रांकफुर्ट हिरवे शहर आहे, खूप झाडे, जंगले शहरातच, नदीकिनारीही आहेत, सायकली आणि चालण्याचे वेगळे ट्रॅक्स त्यात आहेत, तेथे निरुद्देश भटकत असताना मध्येच अचानक खारुताई, ससे  सामोरे येतात, नदीकिनारी चालताना बदके, हंस, पाणकोंबड्या काठाशी राहून धीटपणे आपल्याकडे पाहतात.
 उंच, उंच पाइन्स, थुजांच्या दाटीतून चालताना चुकार उन असलेच तर सूर्य आणि ढगांचा  लपंडाव चालू असतो, क्वचित एखादी हलकी सर येते..(फक्त अशा वेळी भज्यांच्या टपरीची कमतरता मात्र हटकून जाणवते.:))
आपल्याच विचारात  किवा गाण्यांमध्ये हरवून चालताना फार मजा येते.
(आता उन्हाळा सुरू झाला आहे, असं भटकणंही आता सुरू होईल.. तुमच्या लेखामुळे आता लगेचच पाठीवर पाण्याची पिशवी आणि हलकी शिदोरी  घेऊन बाहेर पडतेच,:))
स्वाती