माणसं इतकी चालू शकतात हे वाचून थोडी जळजळ झालीच. इनो मागवला लगेच.
त्यात हे बऱ्यापैकी या पुण्यनगरीतलं चालणं. त्यामुळं थोडी तीव्रता अधिकच. मला काही केलं तरी शहरी रस्त्यावर चालणं जिवावरच येतं आणि रोज उठून कुठं बाहेर जाऊन चालणं खिशावर येतं. त्यामुळं चालणाऱ्यांकडं मी फक्त पहात राहू शकतो.
उत्तम लेखन. चालतानाची आधी हळू असणारी आणि अंग तापू लागल्यावर वाढणारी गतीही वाचताना अनुभवता आली.