माणसें धर्मप्रसारार्थ मारली गेलीं हा इतिहास आहे. आणि यापुढेंही नक्कीच मारलीं जातील. तालिबान्यांनीं बुद्धाच्या पुतळ्यासारखी ऐतिहासिक मूल्य असलेली वास्तू नष्ट केली, अनन्वित अत्याचार केले आणि करताहेत. तालिबानी तसेंच अनेक आक्रमक हिंदू संघटना हें बुवाबाजीचें दुसरें टोंक आहे.

बुवांचे भक्त हे आज अहिंसक आहेत. उद्यां अहिंसकच राहातील कशावरून? बुवाबाजीच्या नांवाखालीं सेक्स रॅकेटस - मला मराठी प्रतिशब्द सांपडला नाहीं - झालेलीं आहेत. कोर्टांत हे बुवा निर्दोष सुटले तर सगळें कायद्याला धरून झालें असें मह्णतां येईल. अशा छुप्या गुन्हेगारांपेक्षां खरे गुन्हेगार परवडले.

दुसरी गोष्ट म्हणजे अशा बुवाबाजींत चलनांतल्या बऱ्याच पैशाचें काळ्या पैशांत रूपांतर होतें आणि अर्थव्यवस्थेवर ताण पडून करवाढ होते. ती तुमच्या आमच्या खिशातून जाते. असे अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुष्परिणाम समाजावर होत असतात. मुख्य म्हणजे समाजाला आध्यात्मिक गुंगी येते आणि दरवाढ, इ. ज्वलंत बाबींकडे जनतेचें दुर्लक्ष होतें. किंबहुना असें दुर्लक्ष व्हावें यासाठींच या बाबांचा जन्म असतो. आपण एक संवेदनाशील आणि सजग नागरिक असूं तर याकडे दुर्लक्ष करणें बरोबर नाहीं. असे लेखच समाजजागृती करतात. इतिहासांत चार्वाक, शतपत्रें, फुले, आगरकर इ. नीं हें कार्य केलें होते. दिवटेसाहेब आपण त्यांची बूज राखलीत. अभिनंदन.

कृपया वरील प्रतिसादकांपैकीं कुणीही हा व्यक्तिगत हल्ला समजूं नये.

सुधीर कांदळकर