तुमचा लेख वाचून एक जुनी आठवण जागी झाली.

७८/७९ साली मी आणि माझा एक मित्र असेच "थेऊरला जाऊया" म्हणून घरून निघालो. पावसाची चिन्हे असल्याने छत्र्या घेतलेल्या होत्याच. सोलापूर रस्त्याने चालत चालत निघालो. वाटेत तुरळक पाऊस लागला. तेव्हा किर्लोस्कर न्यूमॅटिक्सजवळचा उड्डाणपूलही नव्हता. लेव्हल क्रॉसिंग होते. कोयना एक्स्प्रेस येऊन जाईपर्यंत थांबावे लागले होते. पुढे चालत चालत लोणी ला पोहोचलो. पुण्याला जाणाऱ्या कुठल्यातरी पॅसेंजरची वेळ झालेली होती. शाळेच्या सहलीबरोबर थेऊरला मी गेलेलो असल्याने लोणीहून थेऊरला पाऊलवाटेने कसे जायचे ते आठवत होते; पण परतीच्या प्रवासाची खात्रीची /माहितीची सोय नसल्याने, आम्ही लोणीहूनच परत फिरण्याचे ठरवले आणि आगगाडीने पुण्यास परत आलो.