संगणक क्षेत्रात ३०% भारतीय आहेत हे विधान तसे फसवे आहे.भारतीय प्रांगणात कोणत्याही उद्योगात १००% भारतीय असणे हे साहजिक आहे. परदेशांतली टक्केवारी बघितली तरी तिथे चिनी लोक जास्त आहेत असे दिसते. (नक्की आकडे सद्ध्या हाताशी नाहीत.) कोरियन ही मुसंडी मारताना दिसतात. फ़िलिपिनो,जपानीही बरेच आहेत. त्या त्या देशांच्या (चीन सोडून) लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे अमेरिकेतले अस्तित्व(प्रेज़ेन्स) जास्त जाणवते.
अवांतर : भारतीयांपैकीही आंध्रप्रदेशियांची संख्या संगणक क्षेत्रात अधिक असावी. एका पी.एच.डी. आंध्रवासीयाने याबाबतीत दिलेले कारण असे : अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या खाजगीकरणाची प्रक्रिया संपूर्ण भारतात आंध्रामध्ये प्रथम सुरू झाली. संगणकक्षेत्रातले हजारो पदवीधर पुरेश्या अनुभवानिशी तेथे तयारच होते आणि तेव्हढ्यात वाय टू के ची सुवर्णसंधी अवतरली. सगळे राव, रेड्डी, नायुडू कॅलिफॉर्निया आणि न्यू यॉर्क वासी झाले. न्यू जर्सी मधल्या मोठाल्या अमेरिकी जेनेरल दुकानात आंध्री लोणची, मसाले, झटपट भाताचे,सांबाराचे प्रकार(पिवळा मुकुट छाप) पुष्कळच दिसतात. त्या मानाने बेडेकर, केप्र अगदी तुरळक.