लेखमाला सुंदरच. वाचनखूण केव्हाचीच घेतली आहे. कितीतरी संदर्भ एका टिचकीवर मिळताहेत, जे शोधायला खूप श्रम आणि वेळ खर्ची घालावा लागला असता.
सहज उत्सुकता म्हणून प्रश्न. या मालेत रेंदाळकर,वा.रा.कान्त,मधुकर केचे वगैरेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे का?
एक निरीक्षण. कविता सुंदरच आहे आणि संग्रहीसुद्धा आहे. कवितेतला सुरुवातीचाच 'तळकोंकण' हा शब्द सह्याद्रितळीचा,समुद्राज़वळचा या अर्थाने वापरला आहे आणि तो योग्यच आहे. कोंकणात 'वलाटी आणि खालाटी' असे भूप्रदेशवाचक दोन शब्द लोकभाषेत आहेत. वलाटी म्हणजे डोंगराळ, घाटप्रदेशातली(घाटमाथ्यावरची नव्हेत. )गावे, तर खालाटी म्हणजे सखल प्रदेशातली किनारी गावे. तळकोंकण म्हणजे खालाटीतली गावे. सद्ध्या मात्र दक्षिण कोंकण,विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा या अर्थाने हा शब्द वापरला जाऊ लागला आहे.