लेख चटकदार आहे, पर एक बात कुछ जँची नहीं. बशीतून पाणीपुरी खायची? छ्या छ्या! अब्रह्मण्यम्! द्रोणातून तोंडात डाय्रेक्ट गेलीच पाहिजे. फारतर सुपातले आणि जात्यातले यामध्ये जितका वेळ तितकाच द्रोणातल्या आणि तोंडातल्यामध्ये असावा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे! शिवाय, देअर इज ऑल्वेज अ गॅप बिट्वीन पुरी ऍण्ड ओठ, म्हणून एखादी पुरी अभिजातपणे शर्ट, साडी, दुपट्टा, यावरही फुटावी. अशा फुटकळ अनुभवांशिवाय ही पाणीपुरीप्रकरणे पुरी होऊच शकत नाहीत जसे, मोसमात एकदातरी हातावरून कपड्यांवर आंब्याचे ओहोळ (ओघळ नव्हे, ओघळ छोटे असतात.) उतरल्यावाचून आंब्याचा सीज़न संपूच शकत नाही.
बंगालीत पाणीपुरीला गोल गप्पा म्हणतात. तोंडाचा जास्तीत जास्त मोठा गोलाकार करून पुरी गपकन पॉप करायची ही क्रियाच असणार या शब्दामागे. 'ओ'कारान्त बाँग्ला बाबूंना ते उपजतच माहित असते. पाणीपुरी खाता खाता गप्पा मारण्याची कलाही त्यांना ज्ञात असावी बहुधा.
एकंदरीत ठीक. आता कशाचा नंबर? शेवबटाटापुरी?
प्रतीक्षागारात आहोत..