'सर्वांगीण कोर्स' साठी वापरलेला 'द्न्यानक' हा शब्द संपूर्ण चुकीचा आहे.
'द्न्यान' ह्या 'शब्दावर' प्रेम असल्यामुळे कदाचित हा शब्द वापरण्याची इच्छा झाली असावी. असो!
'द्न्यान' म्हणजे (एक बाजू)- 'जे जाणण्याजोगे आहे असे ते.' (दुसरी बाजू )- 'ज्याची जाण आहे असे ते'
'विद्' हा शब्द 'जाणण्याच्या क्रियेचा' टप्पा दर्शविण्यासाठी वापरला जातो.
म्हणजे 'विद्' पासून -
विद् + या (व्यंजन)=> 'विद्या' ...टप्पा दुसरा
'विद्' + इअ (स्वर) => 'वेद' 'जे (तत्वद्न्यानाच्या दृष्टिकोनातून ) जाणले गेले आहे असे ते'....टप्प्याचे एक टोक
साद्याचा वापरात येणारा शब्द (योगायोगाने म्हणा की नियतीच्या इच्छेने म्हणा)
'विद्' + आ (व्यंजन)=> 'विदा' ...टप्पा पहिला
'विद्न्यान' या शब्दाची फोड करायची झाली तर -
'विद्' + 'द्न्यान' अशी करावी लागेल. म्हणजे 'जे (भौतिकद्न्यानाच्या दृष्टिकोनातून) जाणले गेले आहे असे ते'.
....टप्प्याचे दुसरे टोक
एखादे 'निरीक्षण', त्या निरीक्षणातून मांडलेले 'सिद्धांत', त्या सिद्धांवर आधारलेले 'प्रमेय', त्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी केलेला 'प्रयोग', त्या प्रयोगाच्या निष्पत्तीतून प्रकट झालेले 'परीक्षण'व या सगळ्या बाबींचा 'पद्धतशीर स्वरूपातील लिखित दस्तावेज' म्हणजे 'विद्न्यान'.
आता वळूया प्रस्तुत लेखात व्यक्त केलेल्या अर्थव्यक्तीकडे. -
'विद्यार्थ्यांना जे शिकवायचे आहे ते' ह्या संकल्पनेला नाव देण्याबद्दल.
वर म्हटल्याप्रमाणे 'विद्या' हा शब्द जाणण्याच्या क्रियेबाबतचा दुसरा टप्पा आहे.
म्हणजे 'विद्येसाठी' 'विदा' कोणता उपयोगात आणला जाणार ह्यावरतीच 'विद्येची' शाखा तयार होणार.
अमुक एका विद्येच्या शाखेचे शिक्षा (प्रचलित शब्द: 'शिक्षण' जो 'शिक्षा'चा 'क्रियाविशेषण' आहे.) देण्याचे विविध प्रवाह उपलब्ध असू शकतात. तेव्हा त्या-त्या प्रवाहांतून त्या-त्या विद्यां चा अभ्यासक्रम वेगवेगळा असू शकतो/ असायला हवा.
म्हणजेच विद्येच्या एका ठराविक शाखेच्या अभ्यासक्रमांमधील भिन्नता ह्या त्यांच्या प्रवाहांच्या वेगळेपणावर आधारली जाऊ शकते.
इथून 'प्रवाहांचे वेगळेपण' हा एक उंबरठा वा एक चौकट मानूया. या चौकटीतून प्रवेश केल्यानंतर विद्यार्थी जी विद्या शिकतो त्या शिकण्याने त्याचा त्या विषयापुरता सृष्टीबोध बदलतो. (बदलला जावा ही अपेक्षा! तेवढी ताकद त्या विद्येत असायला हवी.)
अखेरीस ह्या 'चौकटी'लाच नाव द्यायचं आहे.
वहिवाट, वहाट, पायवाट ह्यासारख्या शब्दांना अहिराणी, खानदेशी, मालवणी, कोंकणी भाषेत काय म्हणतात ते पाहून त्यातील नेमका अर्थव्यक्ती करणारा शब्द योजता येऊ शकतो.
मराठीत यापुढे शब्दनिर्मिती करताना (अर्थव्यक्ती अगोदर व्यवस्थित समजून घेऊन) महाराष्ट्रातील बोलीभाषांचा ही सन्मान केला जावा हि सर्वांना विनंती!!!