गोष्टी आहेत. मला वाटतें आपल्याला तत्त्वज्ञान म्हणायचें आहे. मझ्या मतें विशिष्ट विचारसरणीच्या वा वर्गसमूहाच्या फायद्यासाठीं वा सोयीसाठीं निर्मिलेलें एकांगी तत्त्वज्ञान म्हणजे अध्यात्म. तत्त्वज्ञान हें संपूर्ण मानवजातीच्या हितासाठीं शब्दच्छल न करतां निर्मिलेलें असतें आणि त्यांत, काय चांगलें काय वाईट याची निःसंदिग्ध व्याख्या केलेली असतें तसेंच स्पष्ट शब्दांत नेमक्या अर्थाचें तार्किक विश्लेषण असतें. चिकित्सेला - स्केप्टिसिझमला भरपूर वाव असतो. अंधश्रद्धेला वा निराधार गृहीतकाला येथें थारा नसतो.
अध्यात्म आणि तर्क, बरेंवाईटाची नेमकी व्याख्या यांचा फारसा संबंध नसतो. सोयीप्रमाणॅ आणि संदिग्ध शब्दांत बरेच उल्लेख असतात. अध्यात्म म्हणजे शब्दांचे बुडबुडे.
अर्थात हीं माझीं मतें आहेत. इतरांचीं वेगळीं असू शकतील आणि मला पटलीं नाहींत तरी त्या मतांचा आदरच असेल.
विज्ञानाला तत्त्वज्ञानाची जोड हवीच, ती दिली नाहीं तर हाहाकार माजेल असें बहुतेक नामवंत शास्त्रज्ञांचें मत आहे. बऱ्याच वेळां तत्त्वज्ञानाऐवजीं अध्यात्म हा शब्द शास्त्रज्ञांकडून वापरला जातो परंतु त्यांना तत्त्वज्ञान हा अर्थ अभिप्रेत असावा.
सुधीर कांदळकर