तुम्ही दिलेल्या दुव्यात फक्त ३च पाने आहेत. पान ३ वरील पहिलेच वाक्य अर्धवट वाटते. पुन्हा एकदा दुवा तपासून बघितला तर चांगले होईल. असो.
तुमचा उद्देश खूपच छान आहे. मला हि कल्पना आवडली. सद्यस्थितीत तुमचा लेख अर्धवट वाटल्याने अधिक लिहू शकत नाही.
वरच्या प्रतिक्रिया वाचून जुना किस्सा आठवला. हा खेळाडू सुनील गावस्करचा समकालीन असावा. एकदा तो सराव करत होता. त्याने चेंडू टोलवला आणि त्याच्या प्रशिक्षकाने त्याला हटकले, "अरे तुझा पाय कुठे आहे ? " त्यावर तो म्हणाला, "सर चेंडू कुठे आहे ते बघा ना, पाय काय बघता?". चेंडू सीमेपार गेला होता.
आणखी एक :- आमच्या एका इंग्रजीच्या शिक्षकाची मुलगी पळून गेली. ते दुःखी. आम्ही सांत्वन करायला गेलो, तर ते चिडून म्हणाले, " नालायक कार्टी, पळून जाताना इंग्रजीत चिठ्ठी लिहून ठेवली, त्यातसुद्धा ४ चुका.... "
त्यामुळे मनावर घेऊ नका... मी वाचतोय ... लिहा ... आणि चर्चाही चालू द्या. मी काही मदत करू शकत असेन, तर नक्की कळवा.
शुभेच्छा !