योगप्रभू
त्या आजोबांशी तुमचा सविस्तर संवाद झालेला नाही. ते इतक्या रात्री पुस्तक का विकत होते, याचे कारण तुम्ही विचारलेले नाही अथवा त्यांनी सांगितलेले नाही. म्हणजेच त्यानंतर तुमच्या मनात आलेले विचार हे केवळ एक तुमचा तर्क आहे. आजोबांना मुले विचारत नसतील ही एक शक्यता, पण इतरही शक्यता असू शकतील. उदा - १) आजोबांना निद्रानाशाचा विकार असू शकेल त्यावर त्यांनी हा उपाय शोधला असेल. २) दीनवाणा चेहरा व वय हे आजोबांचे भांडवल असू शकेल. त्या जोरावर ते निवृत्तीनंतर व्यवसाय करत असतील ३) दिवसा लहान मुले व इतर विक्रेते पुस्तके विकतात. त्या स्पर्धेत दमण्यापेक्षा रात्रीच्या निवांत वेळी विकणे त्यांना फायद्याचे ठरत असेल. ४) आजोबांचे घरी पटत नसेल म्हणून पुस्तके विकून ते वेळ घालवत असतील व सगळे झोपल्यावर ते घरी जात असतील. वगैरे.
बरोबर आहे... तर्कच आहेत. ते तुम्हाला पटावे असा माझा आग्रह नाही. पण वर तुम्ही दिलेले तर्क मला पटत नाहीत....
मला नाही वाटत की निद्रानाशाच्या विकारामुळे सत्तरी उलटलेली व्यक्ती रात्री बेरात्री रस्त्यावर पुस्तके विकेल... रस्त्यावर भरधाव जाणाय्रा गाड्यांमुळे आजकाल चालताना प्रत्येकालाच जीवाची भीती असते... अगदी तरुणांनाही... त्यात आजोबांचे वय.... रस्त्यात काही त्रास होऊ लागला तर भर दिवसा कुणी मदत करेल ह्याची खात्री देता येत नाही.... रात्रीची गोष्टच सोडा...
दिवसा पुस्तके विकण्यापेक्षा रात्री त्यांना फायदा होत असेल असे मला वाटत नाही... रात्री मुळात रस्त्यावर माणसे कमी असतात... जी असतात ती तरुण मुले मुली... बव्हंशी बाईक वर.... रात्री बाहेर भटकण्याच्या उद्देश हॉटेलिंग किंवा सिगारेट.... त्यात पुस्तके विकण्याचा धंदा जास्त होत असेल असे मला वाटत नाही... तसेच घरी पटत नाही म्हणून रात्री उशीरापर्यंत बाहेर भटकून सगळे झोपले की घरी जात असतील हे तर अशक्य वाटते... आधीच घरी पटत नसेल तर उशीरापर्यंत बाहेर भटकून आणखी कोण घरच्यांचा रोष ओढवून घेणार आणि दुसय्रा दिवशी बाहेर पडणार?
त्यांचा खर्च भाचा का करतो? त्याने मुलाशी संपर्क साधला नाही का? मुलाचे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. या बातमीचे कात्रण जरी संबंधित देशाच्या दूतावासाला किंवा तो काम करत असलेल्या कंपनीला पाठवले तर त्या मुलाची नोकरी जाऊ शकते किंवा भारतात परत पाठवणी होऊ शकते. परदेशात अशा गोष्टी हलकेच घेत नाहीत. परदेशात गेलेल्या मुलांच्या भारतात एकट्या राहणाऱ्या पालकांची संघटना आहे. तिने काय केले? जर ही घटना नावानिशी प्रसिद्ध झाली असेल तर जवळच्या नातलगांनी, मित्र परिवाराने, अमेरिकेतील भारतीय समाजाने काही मध्यस्थी केली नाही का? हा पाठपुरावा प्रसिद्ध झाला का?
त्यांचा खर्च भाचा का करतो??? मला ह्या प्रश्नाचे आश्चर्य वाटते आणि ह्यावर काही वक्तव्य करायची माझी इच्छा नाही.
त्याने मुलाशी संपर्क साधला नाही का? ह्याबद्दल मला काहीही माहिती नाही... पण संपर्क केला असेल आणि त्यांच्याने शक्य झाला तेवढा पाठपुरावाही त्यांनी केला असेलच असे मला वाटते... जगात अनेक गुन्हे घडतात त्यात किती गुन्हेगारांना शिक्षा होते हा देखिल वादातीत मुद्दा आहे... त्यात हे तर सर्वसामान्य लोक... सोबत पैसा नाही... त्यामुळे ह्याचे नक्की काय झाले हे मला सांगता येणार नाही... त्यात मी आधीच लेखात म्हंटल्या प्रमाणे ही घटना मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली आहे.... त्यांच्या वयोगटातील पुण्यातल्या लोकांना कदाचित हे वाचल्याचे आठवत असेल... आणि मी म्हंटल्याप्रमाणे निवारा मध्ये हे काका काकू राहत असत... आता त्यांची वये... ते आहेत- नाहीत मला काहीच माहीत नाही... त्यामुळे निवारा वाले ह्याची सविस्तर माहिती देउ शकतील... अर्थात काका काकूंच्या परवानगी शिवाय नक्किच नाही...
आणि मुळात ह्या दोन्ही घटना सांगण्यामागे ह्या घटनांच्या सत्य असत्यतेचा पडताळा करणे हा उद्देशच नव्हता.... समाजाच्या ह्या प्रव्रुत्तीची चीड हे देखील एक जनरलाईज्ड स्टेटमेंट आहे... पण ह्याचा अर्थ असा नाही होत की सगळा समाज खराब आहे... आजही एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारे लोक आहेतच की. मुलांना आजी आजोबांचे प्रेम मिळावे म्हणून एकत्र राहणारे लोक आहेतच.... परंतु समाजामध्ये ह्या प्रव्रुत्तीची लोकही आहेत... आणि संपूर्ण विषय ह्याच प्रव्रुत्तीबद्दल बोलण्यासाठी मांडला आहे. वरील दोन्हीही उदाहरणे हा विषय मांडण्यासाठी वापरली आहेत जी ह्या लोकांच्या मनोव्रुत्तीचे प्रतिनिधित्व करतील...
असो... मला वाटते की मी माझा विचार मांडला आहे... तुम्हालाही तुमचे विचार मांडायचे स्वातंत्र्य आहेच...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सुधीरजी : तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार... मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे.... अशी माणसे आहेत आणि अशीच माणूसकीही जिवंत आहे.
प्रशासकः शुद्धीचिकित्सक फक्त अर्ध्या प्रतिसादाचे परीक्षण करून पुढे अडकला... त्यामुळे २७२ शब्दांपुढे असलेल्या शब्दांचे परीक्षण झालेले नाही..