कांदळकरसाहेब...

...(काटदरे) यांचें नांव बहुधा मीं गणपतीपुळ्यापासून केवळ २ किमी वर असलेल्या मालगुंडला केशवसुतांच्या स्मारकांत वाचल्याचें आठवतें. तिथें एकेका कवीचें रेखाचित्र आणि त्याखालीं त्यांच्या निवडक कविता आहेत. काव्यरसिकांसाठीं ती एक पंढरीच आहे.


- अगदी खरे असणार तुमचे म्हणणे. पाच-सहा महिन्यांपूर्वी परिचयातील एक कुटुंब तिकडे गेले होते. त्यांनीही अगदी असेच वर्णन केले. तिथे केशवसुतांच्या हस्ताक्षरातील त्यांच्या कविता लावलेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. केशवसुतांचे वळणदार, घाटदार अक्षर पाहून त्या कुटुंबातील काही लोक अगदी भारावून गेले होते.

- प्रत्येक मराठी साहित्यप्रेमीनें आयुष्यांत निदान एकदां तरी तिथें निवांत वेळ काढून जायला पाहिजे.


- अगदी. अगदी.

कारण कविता डोक्यांत शिरायला मला वेळ लागतो.

- खरेच??? :) तुमच्या प्रतिसादांवरून तसे वाटत नाही.


प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.