सहज उत्सुकता म्हणून प्रश्न. या मालेत रेंदाळकर, वा. रा. कान्त, मधुकर केचे वगैरेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे का?

वर्णी??? :) 
तुम्ही उल्लेख केलेले सर्वच कवी मातब्बर आहेत. त्यांच्यावर लिहायला मला नक्कीच आवडेल. आनंद वाटेल.

१) रेंदाळकर - यांच्याविषयीची बरीच माहिती गोळा केलेली आहे... त्यांचा काव्यसंग्रह मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रेंदाळकरांविषयी परिपूर्ण माहिती मिळविण्याच्या कामाची प्रगती सध्या तरी 'अजून चालतेचि वाट... '!   :) 
काव्यसंग्रह हाती आला की पुढील महिन्यात त्यांच्यावर नक्कीच लिहीन.

२) वा. रा. कान्त - आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱया सुंदर सुंदर गाण्यांमधून कान्त आपल्याला अधूनमधून भेटत असतात. त्याअर्थाने ते स्मरणाआड गेलेले आहेत, असे वाटत नाही. तुम्हाला त्यांची माहिती हवी असेल तर ती मी नक्कीच पाठवीन.

३) मधुकर केचे - केचे हेही अगदी अलीकडच्याच, लगतच्याच पिढीतील कवी आहेत. यांची कविता तुलनेने कमी प्रमाणात असली तरी हेही (तसे) स्मरणाआ़ड गेलेले आहेत, असे वाटत नाही.
केचे यांनी पूर्वायुष्यात जेवढ्या प्रमाणात आणि जेवढ्या उत्कटतेने कविता लिहिली, तेवढ्या प्रमाणात आणि तेवढ्याच उत्कटतेने उत्तरायुष्यात लिहिली नाही. पुढे पुढे जवळपास त्यांचे काव्यलेखन थांबल्यासाऱखेच झाले होते.
केचे यांचीही माहिती हवी असल्यास मी ती तुम्हाला पाठवीन.

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.