काली घटा छाए..(येथे ऐका)

काली घटा छाए
मोरा जिया तरसाए..

एखादं गाणं किती सुरेख असावं याला काही मर्यादा?

'काली घटा छाए.. ' हे असंच एक नितांत सुंदर गाणं.. एका अल्लड तरुणीचं मनोगत.. स्वत:शीच गुणगुणणं, स्वत:शीच साधलेला एक संवाद.. मनाला भिडणारा!

मेरे हाथो को थामे, हसे और हसाए
मेरा दुख भुलाए किसी क्या जाए..?!

क्या बात है! या ओळींतले पॉजेस खासच आहेत.. एकाकी, बेरंग आयुष्य असलेली तरुणीदेखील एखाद दिवशी किती आशादायी, किती सकारात्मक विचार करू शकते! गाण्याच्या चालीत, सुरावटीत, सचिनदांनी फार सुंदर मांडली आहे ही कल्पना! शांत-सुरेख चाल, वाद्यमेळाची कुठेही गर्दी होऊ न देता फक्त सतार आणि बासरीची सुंदर संगत!

आशाताईंना तर दंडवतच आहे.. त्यांचा सुरेलपणा, गाण्यातले भाव! 'ऐसे मे कही, कोई मिल जाए, रे.. ' ही ओळ फक्त त्याच गाऊ शकतात! गाणं गातात सगळेच जण. परंतु गाण्यातनं बोलणं म्हणजे काय, सहजसोपा संवाद साधणं म्हणजे काय, हे या गाण्यातून आशाताईंकडून शिकावं!

आणि नूतनच्या चेहऱ्यावरील गोडवा, तिचं ते निरागस दिसणं!

सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.