'वर्णी' ह्या शब्दाच्या बाबतीत थोडे चुकलेच. त्या वाक्याऐवजी '----कवींना स्थान मिळण्याची शक्यता आहे का? ' असे वाक्य हवे होते. नि:शब्दपणे चूक लक्ष्यात आणून दिल्याबद्दल आभार.
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या गाण्यांमुळे वा. रा. कांत अजून स्मरणाआड गेलेले नाहीत हे मान्य. मधुकर केचे यांचा जीवनकाल अलीकडचा असला तरी त्यांची कविता मात्र विस्मृतीत गेल्यासारखी वाटते. ती प्रामुख्याने त्यांच्या पूर्वायुष्यातली असल्याने तशी जुनीच आहे.
लेखमाला आवडते आहे, हे यापूर्वी लिहिले आहेच.
आणखी, किरकोळ : 'लतापुष्पा' ऐवजी 'लतापुषा' असे टंकन अनवधानाने अथवा नजरचुकीने झाले असावे बहुतेक.