आणखी, किरकोळ :   'लतापुष्पा' ऐवजी 'लतापुषा' असे टंकन अनवधानाने अथवा नजरचुकीने झाले असावे बहुतेक.

लतापुष्पा,  तुमच्या नावात माझ्याकडून (अनवधानाने) बदल झाला, त्याबद्दल क्षमा असावी. याबाबतीत माझंही थोडं चुकलंच!
पण आता तुमच्या नावात 'प'ची वर्णी न लावता त्याला स्थान दिलेले आहे. :)
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

- वा. रा. कान्त यांच्या कविता मला खूप आवडतात. त्यांच्यावर लिहिता येईलही. या सदरात न लिहिता वेगळा लेख लिहिता येईल. हा विषय मी मनात ठेवतो.

- केचे यांची कविता विस्मृतीत गेल्यासारखीच आहे खरी; पण काल म्हटल्याप्रमाणेच त्यांची कविता तशी खूपच कमी आहे. (म्हणूनही तसे असेल का? माहीत नाही. पण केवळ एकाच कवितेमुळे ओळखले जाणारे कवीही खूप आहेत.  केवळ एका किंवा केवळ काही कवितांमुळेही ओळखल्या जाणाऱया कवींपुढे तर मी सदैव नतमस्तक असतो.  पण यात गंमत अशी की, आपण नेमक्या कोणत्या कवितेमुळे ओळखले जाऊ, हे काही कोणत्याच कवीला आधी ओळखता येऊ शकत नाही...!!! म्हणून मग अनेक कविता लिहिल्या जात असाव्यात.  :)  :) :) गंमत सोडा. पण खरोखरच अनेक कवींची अशी ओळख आहे.

उदाहरणार्थ -

केशवसुत म्हटले की, झपुर्झा,  तुतारी,  नवा शिपाई या कविता मला चटकन-पटकन आठवतात.
केशवसुतांच्या कवितांमधील काही ओळी तर अगदी विसरू म्हणता विसरता न येणाऱया आहेत, ही बाब अलाहिदा.  
उदाहरणार्थ - १) विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या-त्याच्या डोक्याएवढा. २) आम्ही नव्हतो अमुचे बाप, उगाच का मग पश्चात्ताप?

बालकवी म्हटले की 'श्रावणमासी' आणि 'दुंबर' या दोनच कविता (मला तरी) ठळकपणे आठवतात. या दोनच कवितांनी बालकवींना अजरामर करून ठेवले आहे. मात्र, धर्मवीर संभाजीमहाराजांवरील त्यांची कविता वाचताना असे वाटते की, 'श्रावणमासी' आणि 'औंदुंबर' लिहिणारे बालकवी ते हेच का??? असो. बालकवींची आणखी एक कविता मला खूप आवडते, ती म्हणजे 'कुणी नाही गं कुणी नाही... आम्हाला पाहत बाई'. बस्स. एवढेच.
केवळ एकाच किंवा केवळ काहीच कवितांमुळे ओळखल्या जाणाऱया आणखी इतरही अनेक कवींची अशी उदाहरणे देता येऊ शकतील.

केचे म्हटले की  'एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू' ही एकच कविता प्रामुख्याने मला आठवते. मात्र, ही कविता अनेकांना माहीत असावी, असे म्हणता येईल की नाही कुणास ठाऊक! केचे यांच्या अन्य कविता (मला तरी) आठवत नाहीत.
केच्यांविषयी इतर 'गद्य' माहिती बरीच सांगता येईल. त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्रांचे एक पुस्तक आहे. 'चेहरे' किंवा असेच काहीतरी. कविवर्य ग्रेस यांच्यावरील लेख त्या पुस्तकात आहे.  ग्रेस यांच्याविषयीची वेगळी माहिती त्यात आहे.

प्रतिसादाला तातडीने (प्रती)प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. लोभ आहेच. असाच राहू द्यावा.