९५ साली बॉस्टनमुक्कामी 'वॉक फॉर हंगर' (की असाच काहीतरी) चालायचा कार्यक्रम होता. आमच्या कंपनीतल्या एका उत्साही भारतीयाने आम्हाला प्रवृत्त करून नेले होते. बॉस्टन गावठाणातून निघून (माझ्या आठवणीप्रमाणे) न्यूटन गावापर्यंत आणि तेथून परत बॉस्टनकडे असा एकंदर वीस मैल चालायचा कार्यक्रम होता. हजारो लोकांनी भाग घेतला होता. (मला वाटते हा कार्यक्रम दरवर्षी वसंत ऋतूच्या सुरवातीला तेथे असतो. अगदी लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व वयाचे लोक भाग घेतात. मध्येच सोडून परत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी बस ठेवलेल्या असतात.)
वीस मैल पार करायला जड गेले नाहीत. दहा मैलानंतर एक विश्रांतीचा टप्पा होता. तेथे बसलो नसतो तर बरे झाले असते असे नंतर वाटले. वीस मैल संपल्यावर गाडीत बसून जेवण्याच्या ठिकाणी गेलो. तिथून पुढे पायांनी अस्तित्व दाखवायला सुरवात केली
. पुढे दोन दिवस चांगली आठवण राहिली होती