सुरू झाला कसा, सोसाट्याचा वारा
हलवी गदागदा खूप, सर्व उंच तरुवरा
मागोमाग येती कशा, वळवाच्या धारा
चिंब भिजवुनी टाकती , सुंदर वसुंधरा
अवचित झालेल्या या, शिडकाव्याने
प्रफुल्लित होई सृष्टी, किती आनंदाने
सुसह्य होई ग्रीष्म, शीतल गारव्याने
काहिली शांत होई, अंगाची पावसाने ... छान !