मी ही कविता वाचल्यानंतर माझ्या एका मित्राने मला नंतर झालेल्या भेटीत मला सांगितले की, तुला माहितही नाही तु काय केले आहेस ते? अरे तुझी कविता ऐकायच्या आधी चार दिवस माझे व माझ्या मुलाचे भांडण होऊन तो कायमसाठी घर सोडुन निघून जातो असे सांगून गेला होता. अस्वस्थ मनात ही कविता घोळत होती. रात्री बारा वाजता ऊठलो आणि त्याला शोधून काढले. त्याला फक्त हाक मारून घरी आलो. मुलगा अर्ध्या तासात घरी आला.
सतीशजी, मी रडलो त्या दिवशी. आपल्या वेड्यावाकड्या शब्दांनी असे काही होत असेल हे मला कळलेच नव्हते.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.