अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचा संबंध  वरच्या माळ्यावरील घरात जाण्यासाठी असलेल्या जिन्याप्रमाणे आहे. तत्त्वज्ञानात अनेकांनी अनेक प्रकारे केलेला एकाच तत्त्वाचा ऊहापोह असतो. त्यातील सार आपणास घ्यायचे असते. तेव्हढी विचारांची पात्रता प्रत्येकाकडे असेलच असे नव्हे. त्यामुळे तत्त्वज्ञान किचकट वाटते. सामान्य माणूस त्यापासून दूर राहातो. अध्यात्माच्या साध्यतेसाठी मात्र ते उपयोगी ठरते. जे प्रत्यक्ष नाही पण जे निःसंदिग्ध या सृष्टीचे मूळ आहे, त्याचा शोध घेण्यासाठी तत्त्वज्ञान शंभर टक्के अत्यावश्यक आहे, असे मात्र नाही. ती एक वैयक्तिक अनुभूती आहे.  

...संपूर्ण मानवजातीच्या हितासाठीं शब्दच्छल न करतां निर्मिलेलें असतें आणि त्यांत, काय चांगलें काय वाईट याची निःसंदिग्ध व्याख्या केलेली असतें तसेंच स्पष्ट शब्दांत नेमक्या अर्थाचें तार्किक विश्लेषण असतें. ... हा विषय नीतीशास्त्राचा आहे. असे मला वाटते.