टुकार, भंकस मालिकांमध्ये एक मालिका आली वसकन
राखी, राहुल दोघांचेही, अजुनी एक स्वयंवर झाले
:)
विवाह झाल्यावर तो शिकला शेपुट घालुन नुसते बसणे
आधी तर तो पुरूष होता त्याचे मांजर नंतर झाले
:))
घरी अचानक कितीक साड्या, पर्स, दागिने, चपला आल्या
माझ्या कमी पगाराचेही कसे कसे भाषांतर झाले
:)))
जुन्या गावच्या गुत्त्यामधल्या गिर्हाईकांना म्हणेल आंटी
"नवीन जागी सुद्धा त्याचे खुल्या गटारातच घर झाले"
:))))