कधी"चल काही नाही होत" किंवा " चलता है / चालायचंच" किंवा "त्याला काय होतंय" अशा सवयी फक्त वरती सांगितलेल्या उदाहरणांनाच नाहीत तर आपल्या दैनंदीन आयुष्याला देखील घातकच.  उदाहरणार्थ (थोडसं अवांतर होइल पण संबंधीत) म्हणजे एखादी अयोग्य गोष्ट करताना आणि दुसऱ्याला करायला लावताना "चल काही नाही होत" करून तर बघू, कधी कधी विनाकारण वेळेचा अपव्यय होतो पण परिस्थीती बदलण्याची मानसिकता नसते ( सरकारी कचेऱ्या एक उत्तम उदाहरण ) तेव्हा "चालायचंच" म्हणून स्वतःची समजूत घालायची. तसंच " कोण काय म्हणतंय / त्याला काय होतंय" असं म्हणत म्हणत मनाला योग्य वाटेल ते, जे भले दुसऱ्यासाठी अयोग्य करत रहायचं. लेखाच्या शिर्षकाप्रमाणे इथे सांगितलेल्या सवयी सुज्ञपणे टाळल्या तर आपल्या दैनंदिन आयुष्यात थोडी सुसूत्रता आणता येईल. काय?