गेल्या काही महिन्यांमध्ये मी स्व त:  विंडॉज ला कंटाळून लायनक्स मिण्ट टाकले आहे.

उबुटू अतिशय सुंदर  ओ. एस. असली तरी काही तोटे वाटतात. एक म्हणजे बरेचसे फोर्मॅटस त्यावर बाहेरून टाकावे लागत असल्याने घरी ईंटरनेट नसेल तर त्या वाटेला जाऊ नये. दुसरे म्हणजेGnomeBased असल्याने विंडॉज ज्याच्या सवयीचे असेल त्याला थोडे उबुटू वर परके वाटू लागते.

यावर उपाय म्हणजे वर सुचवल्याप्रमाणे Linux Mint टाका ..  झकास व वेगात चालते .. माझा अनुभव अतिशय चांगला आहे. यात बरेचसे Format in-built असल्याने आपला संगणक ओ. एस. टाकल्या टाकल्या कामसू बनेल.



    पण अजुनही थोडीशी भीती वाटतेच की नाही जमलं तर ? कारण संगणक चालवणे यापलिकडे ज्ञान नाही. आणि मराठीत लायनक्सबद्दल कुठे माहिती नाही. असल्यास कल्पना नाही.


  माझा कयास आहे की आपण मुख्यत्वे खालील कामांसाठीच संगणक वापरता. यातील सर्व कामे लिनक्स मिण्टवर विनातक्रार करता येतात व वापरण्याची पद्धत विंडॉज पेक्षा फार वेगळी नाही.

१ गाणी ऐकणे
२ पिच्चर बघणे
३ इंटरनेट
४ ऑफिस (जसे वर्ड / एक्सेल )


    अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लायनक्स करू शकणार नाही.


१ बहुतांश गेम्स ( उच्चप्रतीच्या हाय एण्ड गेम्स) लायनक्स वर चालत नाहीत.
२ आपण DTP च्या क्षेत्राशी संबंधित जर सॉफ्टवेअर वापरत असाल
३ काही प्रोपायटरी  सॉफ्टवेअर

जगातील बहुतांशी सॉफ्टवेअर विंडॉज साठी विकसित झाली आहेत.
अशी  सॉफ्टवेअर रन करण्यासाठी आपण WINE नावाचे  सॉफ्टवेअर इंन्स्टालl करावे. यामुळे विंडॉज ची बरिचशी सोफ्ट्वेअर विनातक्रार चालतात.