खाजगीच नाही तर सरकारी चेक, विशेषतः शेतकऱ्यांना दिलेला चेक, वटला नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. हल्ली बहुतेक बँका एकमेकांना इन्‍टरनेटने जोडलेल्या असल्याने चेक एका दिवसात वटू शकतो. सहीची तपासणीसुद्धा संगणकावरून करता येते. डिमांड ड्राफ्टचे पैसे मात्र तत्काळ मिळतात किंवा खात्यात जमा होतात. डिमांड ड्राफ्टचा खर्च ड्राफ्ट काढणाराच भरतो, फारतर दुसऱ्या बाजूच्या माणसाची परवानगी असेल तर, वटणावळीचे पैसे कापून घेऊन उर्वरित रकमेचाच ड्राफ्ट घेता येतो.  पण सहसा असे कोणी करत नाही. वटणावळ अगदी क्षुल्लक असते.
चेक किंवा ड्राफ्ट पोस्टाने पाठवायचा असेल तर पैसे मिळायला वेळ लागणारच.--अद्वैतुल्लाखान