भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य माणसाने गेरिला वॉर उघडलं पाहिजे. म्हणजे गनिमी कावा. कारण, भ्रष्टाचाराविरूद्ध मोहिम किंवा संघटना वगैरे उघडली तर ते पब्लिक होणार मग संघटनेवर दबाव, नंतर तीच संघटना पॉलिटिकल होणार, वगैरे प्रॉब्लेम्स त्यात आहेत.
आता हा गनिमी कावा करावा कसा? त्यासाठी डायनामिक सोशल नेटवर्किंग कराव? जर कुठे भ्रष्टाचार होतो आहे असं वाटलं तर त्या व्यक्तिने त्या नेटवर्कवर त्याचा तपशिल द्यावा. इतर मेंबर्सनि ज्यांना शक्य असेल त्यांनी काही काउंटर मेजर्स घ्यावेत. उदा. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकाऱ्याला फोन लावणे वगैरे.. 
ही व्यवस्था प्रत्यक्षात येणं सहज शक्य आहे. मी यासाठी प्रयत्न करायला तयार आहे. कोणी कोलॅबोरेट करायला तयार असेल तर संपर्क साधावा...