हे तर अगदी आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन असं झालं.

सध्या माझ्याकडे १०० एम बी पी एस ची जोडणी आहे (विद्यापिठाची कृपा). त्यामुळे तशी अडचण नाही. मात्र तारविरहित जोडणी करणे अजून जमले नाही. सेक्युअर नेटवर्कवर जोडणी करणे आणि त्यातले ते आकडे देणे थोडं कठिण वाटलं. असो. इथे सगळेच (विद्यापीठाचा सर्व्हरही बहुदा) खिडक्या वापरतात. जाउ द्या ...

मला कधीकधी मॅटलबमध्ये डीफरंशिअल इक्वेशन सोडवावे लागते. ते काम "पायथॉन" किंवा "स्कायलॅब" करू शकेल असे वाटते. फक्त थोडं शिकावं लागेल म्हणा.

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आणि विषेश म्हणजे माझा हुरुप वाढवल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या भारतात असलेल्या मित्रांसाठी मी लिनक्स मिंट पाठवायचा विचार करतोय. त्याला जालावरून काही सॉफ्टवेअर उतरवण्याची गरज नाही ना ? फोटोशॉप सारखे ऍप्लिकेशन त्यात आहे का ? की त्यासाठी उबुंटू बरे राहिल ? उबुंटूच्या रिपोझिटोरिज उतरवून डीव्हीडीत ठेवता येतील का ?

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.