१९७४ ते ७६ मधल्या अडीच वर्षांत तसेंच १९७८ ते १९८१ मधल्या अडीच वर्षांत एकदांही हरवला नव्हता. पण ७८ सालच्या छोट्या खाजगी कंपनीतल्या डब्याच्या आठवणी मस्त आहेत. कधीं डबा घरून निघायचा आणि मला सरकारी कार्यालयांत बाहेर जावें लागायचें. मग मी कामगार बंधूंना माझा डबा खाऊन टाका अशी सूचना द्यायचा. तो खाण्यासाठीं मशीन ऑपरेटर मुलें आणि पॅकिंगच्या मुली यांच्यात तुंबळ युद्ध व्हायचें.
एकदां तर मला सकाळपासून ठाऊक होतें कीं मी आज दुपारीं बाहेर जाणार. मग मीच डबा तयार करून ठेवला. सर्वांत खालच्या डब्यांत दोन लगोरीचे दगड, त्यावरच्या डब्यांत दोन गेलेले बल्ब्स, त्यावरच्यात चार अंड्यांचीं कवचें आणि सर्वांत वरच्यांत रद्दीचे वर्तमानपत्राचे तुकडे असा मेनू भरून ठेवला. तो डबा उघडल्यावर काय झालें तें ऐकायला फारच मजा आली होती. अर्थात मला दुसऱ्या दिवशीं त्याचा दंड डबाखाऊंसाठीं वडापाव मागवून भरावा लागला.
सुधीर कांदळकर