जे आपल्याला आधीच ठाऊक आहे ते पुन्हा एकदा पुनर्संशोधन करून जगापुढे आणावे, ही माझी इच्छा आहे. दुसऱ्या कोणी हे संशोधन करून ते जगापुढे आणले की आपण "हे आमच्या पूर्वजांना माहिती होते" असा टमकेपणा करायला पुढे येतो. आपण मात्र या वारशाला जपत नाही, तर आधी टिंगल करतो आणि इतरांनी (परकीयांचा शिक्का बसल्यावर), मोठेपणा दाखवायला पुढे येतो.

आपल्या पूर्वज ज्ञानी होते, यात काहीच शंका नाही, पण ते ज्ञान पुढे चालवल्या गेले का? आजही संस्कृत मंत्रात कितितरी गोष्टी काव्यस्वरुपात असतील, ज्या आपण समजू शकत नाही, त्यावर आपण संशोधन का करू नये ? आणि हेच संशोधन पाश्चिमात्यांनी केल्यावर त्यांचं कौतुक करायचं सोडून आपण उगाच आपला टेंभा मिरवतो, हे चुकीचं वाटतं मला.

दिल्लीच्या लोहस्तंभाचे तंत्र आपण का सोडवू इच्छीत नाही ? त्यावेळच्या प्रकाशयोजनेचा आज वापर करून (किमान सौर-ऊर्जेचा प्रकाशासाठी) विजेचा अभाव कमी करण्याचा प्रयत्न का करत नाही. (उदा. अजिंठा लेणी - इथे पाण्याचे छोटे तळे वापरून आणि अनेक आरसे वापरून सूर्यप्रकाश वापरला जात असे.) चुभुदेघे.

आपले पूर्वज श्रेष्ठ होते, पण आपण करंटेपणा केला, इतकच माझं म्हणणं आहे.