मला वाटते की सगळ्या विषयात भारतीयांची कामगिरी पाश्चिमात्यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे झाकली गेलीय. त्याला उजाळा द्यायलाच हवा, किंबहुना हा एकच मार्ग आहे, ज्याने पुन्हा एकदा आपला देश प्रगत होईल.
"भारतीय एडीसन"नावाने ओळखले जाणारे श्री. डी. जी. नायडू आहेत. (गुगल दुवा क्र. १ ), पण मराठी ? माफ करा पण नाव नाही सापडले.
भारतिय संशोधकांबद्दल फारसं कधी शिकवलच नाही. हा मकॅलोचा परिणाम का अजून काय जे असेल ते.
अवांतर :- जगदिशचंद्र बोस भौतिक-शास्त्रज्ञ होते आणि बोस-आईनस्टाईन मधील बोस म्हणजे सत्येंद्रनाथ बोस हे भारतीय शास्त्रज्ञ होते, हे सांगितल्यावर माझ्याच विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटे.
याला काय म्हणावे ?
इथेही ही समांतर चर्चा झालेली आहे.