डी. जी. नायडूंविषयीचा दुवा पाहिला. त्यांच्याप्रती आदर.
'भारताचे एडिसन' म्हणून डॉ. शंकर आबाजी भिसे (जन्म : १८६७, मृत्यू : १९३५) यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्यावर लोकसत्ता (४ एप्रिल २०१०) अंकात लोकरंग पुरवणीत पान ९ वर डॉ. अभिधा घुमटकर यांचा 'भारताचे एडिसन' या शीर्षकाचा सुंदर लेख प्रसिद्ध झाला आहे. मला त्याची लिंक देणे जमले नाही म्हणून संदर्भ देत आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा.
पण त्याचवेळी खेदपूर्वक हेही नमूद करावेसे वाटते, की आपल्या लोकांना आपल्याच प्रज्ञावंतांचे महत्त्व उमगत नाही. याबाबतीत आपण करंटे आहोतच. विजयजी आणि मनोगतीं मित्रांनो! महान कृषिशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे यांची भारतीय आणि मराठी समाजाने केलेली उपेक्षा वाचली तर मन उद्विग्न होते. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेले डॉ. वीणा गवाणकर लिखित 'डॉ. खानखोजे : नाही चिरा, नाही पणती' हे पुस्तक कृपया वाचा.