अश्या वागण्याने आंम्ही आमचा आत्मविश्वास नक्कीच गमावणार नाही तो गमावत चाललोय. योगप्रभुंशी सहमत. मुळात आमचे ज्ञान शिकण्याचा साधा प्रयत्न तरी कुठे करत आहोत? सहा महिने जळणारी नालंदा काय एका दिवसात तयार झाली की काय?. त्या माघे पिढ्यांपिढ्याची ज्ञान साधना होती तेंव्हा कुठे आंम्ही तिथ पर्यंत पोहचू शकलो.
आमचे पुर्वज तर श्रेष्ट होतेच पण आंम्ही हि श्रेष्टच आहोत, कि त्यांची ज्ञान परंपरा आज ही आंम्ही जतन करून ठेवली आहे नाही तर जगात असा एखादा तरी देश दाखवा की सतत ११०० ते१२०० वर्षे पिढ्या दर पिढ्या संस्कृतीसाठी आज ही लढत आहे आणि जे उरलेल आहे ते दोन्ही हाताने मानववंशाच्यासाठी सांभाळत आहे. जगातली रोम संस्कृती थोड्याच कालावधित लढत लढत लयास जाते. पण आज ही आपण टिकून आहोत ह्यात आपले श्रेष्टत्व दिसत नाहि. आपले मुळ ज्ञान संस्कृत मध्ये आहे आणि खेदाची गोष्ट संस्कृत भाषा हि शिक्षणातून हळू हळू हद्दपार होतेय, आणि आंम्ही आज हि ब्रिटिश योजनेनुसार फक्त कारकून जन्माला घालतोय. थोडा फरक पडत चाललाय कि संगणकिय क्षेत्रात आपले लोक , आज जगात चमकू लागले आहेत पण ते बाहेरच्या देशात आपला काय संबध ह्यावर मी अस म्हणतो कीज्ञानाची मक्तेदारी हि कोणत्याही एका राष्ट्राची न राहता ती सर्व जगासाठी खुली असते नाही तर आपण एडिसनने लावलेले शोध आपल्या उपयोगात आणू शकलो नसतो किंवा भारताचा ० चा शोध वापरून आज जगातिल अंकगणित एवढ वाढल असत? दुसरी गोष्ट ते दुसऱ्या देशात राहून संशोधन करतात ह्याची लाज आंम्हाला वाटायला हवी ते फक्त आमच्या वंशातिल आहे म्हणून फुका अभिमान काय कामाचा ? त्यांचा अभिमानच बाळगायला हवा कारण आपल्या देशात त्यांच्या गुणांच चिज झाल असत तर ते कश्याला बाहेर गेले असते अहो पोराच पोट घरात भरत नाही म्हणून तो बाहेरच खातो ह्यात घराला खेद वाटायला हवा!