यशवंत कुलकर्णी Yashwant Kulkarni येथे हे वाचायला मिळाले:



जनसंमर्द एके ठिकाणी दुभागल्यासारखा झाला व त्याच्यात हास्याच्या लहरी उमटल्या. आपल्या दैनंदिन वस्त्रांवर एका बाजूने पूर्ण काळा व दुसर्‍या बाजूने पूर्ण शुभ्र असा वेष घातलेला विदूषक गाढवावर बसून राजसभेकडे येत होता. एका दोराच्या तुकड्याच्या टोकांना एका बाजूला घंटा व दुसर्‍या बाजूला दीप बांधून त्याने तो आपल्या गळ्याभोवती वेटोळ्याने टाकला होता, परंतू घंटेची जीभ काढून ठेवली होती व दीपात तेल अथवा वात ...
पुढे वाचा. : ‍जी.ए. कुलकर्णी - काजळमाया