उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या आयुष्यातल्या पहिल्या काही आठवणींमध्ये ताजीचा कुंकू लावायचा कार्यक्रम आहे. मुडशिंगीच्या तिच्या खोलीत सकाळी दारातून तिरकं ऊन यायचं. आमचं घरही कौलारू होतं, आणि दर दहा-बारा कौलांमागे एकाला काच बसवलेली असायची. त्या काचेतूनही ऊन यायचं. त्या उन्हाच्या झोतात असंख्य धुळीचे कणही दिसायचे. पण त्या नव्या दिवसाच्या ताज्या उबेत आपल्या आयुष्यात धुळीचे कण आहेत याचं फारसं दु:खही नाही व्हायचं. त्या पहिल्या उन्हात, ताजी आरशात बघून मन लावून कुंकू लावायची. आधी मेण, मग कुंकू, मग मेणाच्या हद्दीपलिकडलं कुंकू पुसून बरोब्बर गोल करायची. कधी कधी वाटायचं, ते ...