उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगिरी...
तुमच्या प्रतिसादाचा रोख व आशय ह्यांचा ताळमेळ बसत नाहिये. असो. मी जी कल्पना मांडली आहे, एकतर त्यात सहमती आवश्यक नाहिये. तुम्ही प्रत्यक्ष कृती करू शकता किंवा नाही, बस्स एव्हढच हवय. सहमती असली तरी प्रत्यक्षात काही कारणांमुळे भाग न घेता येणं शक्य आहे.
आता ही जी कल्पना आहे, ती परिपूर्ण असूच शकत नाही, कारण मुळात भ्रष्टाचाराची अनेक रुपं आहेत. नेटवर्किंगच्या माध्यमातून भ्रष्टाचारी व्यवस्थेला काही प्रमाणात धक्के बसले आणि त्यातून थोडाफार फायदा झाला तरी खूप आहे.
तुम्ही लीड घ्या, आम्ही तुमच्या मागून येतो वगैरे ठीक आहे, पण, मी देखिल हे स्वतःचा व्यवसाय सांभाळून करणार असल्याने सुरुवातीला देखिल एकट्याने शक्य होणार नाही. त्यासाठी  ५,६ लोकांची तरी मदत लागेल...