छंद वृत्ताला भेदून जातो, तिथे मात्रांपेक्षा कालभान (टायमिंग) महत्त्वाचे असते. तुम्ही कवितेत रमून बघा तुम्हाला एक लय जाणवेल. अर्थ, कालभान आणि लय मिळून छंद होतो त्यामुळे प्रत्येक ओळीला मात्रांचे बंधन नसते, माझी कविता एक महौल तयार करायला आणि त्यातून परिणाम साधायला बघते. तुम्ही संपूर्ण कडवे वाचा तुम्हाला मजा येईल. वृत्ताचे बंधन मानण्या एवजी तुम्हीही एका मूडची, ते बेअरिंग ठेवून एकसंध अभिव्यक्ती करून बघा तुम्हाला ही जमून जाईल. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

संजय