मी विंडोज ७ वापरतोय सध्या... फारच उत्तम आहे. ऊबुंटू ही टाकले होते परंतु ७ साठी काढून टाकले. आता जमेल तेंव्हा परत टाकेन. ओपन सोर्स चळवळ काही चांगल्या गोष्टींना सुरुवात करून देऊ शकली. मी अजूनही मायक्रोसॉफ्टचाच (फुकट वापरणारा) एकनिष्ठ वापरकर्ता आहे. परंतु ओपन सोर्स चळवळीने आता कात टाकली असून दर्जेदार उत्पादने फुकटात उपलब्ध करून दिली आहेत.