बाजूला येतो कुणी, पाहतो, हसतो
इतक्यात अचानक सिग्नल लागत असतो!
नित्याचा अनुभव, पण तू सुरेख मांडलास....
जे म्हणायचे अंधूक जाणवत असते
तान्हुला कुणी आईस चाचपत असतो
व्वा.........
येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो
जियो....
मी कधी रिकाम्या दुकानातला नोकर
एकटा स्वतःशी उगाच हासत असतो
अर्रे..... प्रत्येकजण अनुभवत असणार हा शेर कधी ना कधी....
अंधारच असतो ह्या खोलीत परंतु
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो
मनाच्या खोलीत असणारा एकाकी अंधार आणि कुठुनशी अचानक डोकावणारी आठवण......