अरुंधती ताई.. तुमचा लेख वाचून अजुनही काही गोष्टी जगाला (आणि मला सुद्धा ) माहित नसाल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. मुळात एखादी अशी वैश्वीक भाषा होऊ शकते हेच वाचून अचंबा वाटला. अर्थात काही गोष्टींबद्दल शंका ही वाटली. उदहरणार्थ.. प्रत्येक भाषेचं एक भाषीक सौंदर्य असतं ते त्या त्या ठिकाणची संस्कृती आणि माती.. प्रादेशीक आणि काही प्रमाणात धार्मिक अशा गोष्टींमुळे ही त्या भाषेत उतरलेलं असतं.