माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

कळायला लागल्यापासून तीन प्रकारचे सुवास मला अगदी वेड लावून जातात........
एखाद्या शांत देवळात गाभाराभर भरून राहिलेला धुपाचा दरवळ. पहिल्या पावसाचे दोन-चार टपोरे थेंब पडल्यावर आसमंत व्यापून टाकणारा मातीचा गंध आणि नुकत्याच उमललेल्या रातराणीचा कणन्कण मोहरून टाकणारा घमघमाट.......
वय वाढत गेलं...पुढं सरकत राहिलो...अध्येमध्ये कुठल्या ना कुठल्या वळणावर ही सुगंधाची बरसात व्ह्यायचीही.. कधी अलवारपणे तर कधी एकदम अनाहूत...
या तिन्हींचा एकत्रित मिलाफ अनुभवायला मात्र २००८ उजाडावं लागलं. गळ्यात गंधार घेऊन अवतरलेली पुण्याची एक छोटीशी गानपरी ...
पुढे वाचा. : कथा – एका सोनकळीची...