मौन शब्दांचे सुरू आहे अघोरी!
त्यावरी ही ढिम्म अर्थांची मुजोरी!
व्वा....
आसवे का एवढी चमकून गेली?
भंगलेले स्वप्न होते का बिलोरी?
शहारा आला...
मी तुझ्या खेळास कंटाळून गेलो...
जन्म हा माझा, तुझी कितवी लगोरी?
शेर एवढा आवडला की काय बोलू....
बोच काट्यांची तशी ही ओळखीची...
बाभळी जेथील या, तेथील बोरी!
प्रचलीत म्हणीच सुरेख वापर....
वाचली कविता तुझी एकेक जेव्हा...
सोडली माझी वही मी सर्व कोरी!
तुमच्या कविता वाचून आमची हीच अवस्था होते....