अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

मागच्या आठवड्यात, दक्षिण आफ्रिकेमधे, जगातला सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉलच्या, जागतिक अजिंक्यपदाच्या किंवा वर्ल्ड कपच्या स्पर्धा सुरू झाल्या. मी मोठ्या उत्साहाने, निदान दिवसा उजेडी तरी खेळल्या जाणार्‍या सर्व मॅचेस तरी बघायच्याच असे ठ्ररवले. उदघाटनाच्या दिवशी मॅच बघण्यासाठी मी 5 मिनिटे आधीच टीव्ही चालू केला. खेळ अतिशय चुरशीचा होत असल्याने मॅच बघायला मजा येत होती यात शंकाच नाही. तरीसुद्धा दहा पंधरा मिनिटानी आपल्याला कसलातरी त्रास होतो आहे हे लक्षात आले. एवढा चुरशीचा खेळ चालू असूनही, एवढे इरिटेट झाल्यासारखे का वाटते आहे ते कळेना. मग ...
पुढे वाचा. : व्हुव्हुझेला- एक तुतारी द्या मज आणुनि !