पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्यापासून आपली सुटका झाली असून गेल्या दोन-चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हवेत चांगला गारवा आला आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे आता पावसाळी सहलीचे बेत आखले जातील आणि पावसात मजा केली जाईल. आपल्या मराठी साहित्यातूनही पावसाचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. मराठी चित्रपटांमधूनही पावसाची गाणी आपण पाहिलेली आहेत. सुरू झालेल्या पावसाच्या निमित्ताने मराठीतील पावसाच्या कविता आणि गाण्यांचे संकलन येथे करत आहे.