ओठांमध्ये अडली होती वेदनेची गाणी
पापणीत दडले होते सुने सुने पाणी 
आभाळही उन्मळून फाटलेले होते
निरोपाचे क्षण उभे ठाकलेले होते!

-रोहित कुलकर्णी