इतरभाषांतील कविता/पद्यांचे भाषांतराचे बाबतीत

पहिला व तिसरा नियम/मुद्दा मनोगतच्या धोरणांशी व उद्दिष्टांशी सुसंगत आहेत व अनेक वर्षे (कदाचित मनोगतच्या स्थापनेपासून) लागू आहेत. परंतु दुसरा "नियम" हा कधी व कोणी बनवला ? मुळात हा संपूर्णपणे अतार्किक व अनाकलनीय आहे. येथील ललित लेखन मराठीत असावे हे प्रशासन सांगू शकते पण कवितेचे भाषांतर छंदोबद्धच असायला हवे हे सांगण्याचा अधिकार प्रशासनाला असू शकत नाही. काव्य छंदात लिहावे की मुक्तछंदात की छंदमुक्त हेही जर कवी (कवितेचा अनुवाद करणाराही कवीच असतो) ठरवू शकत नसेल तर मनोगत प्रशासनाला प्रतिभावंत लेखकांची/कवींची गरज नसून दिलेल्या हुकुमांचे पालन करून ऑर्डरीनुसार लेखन करणारे भाट-चारण हवेत असे नाइलाजाने समजावे लागेल. हे धोरण मनोगतच्या हिताचे नाही व ते ताबडतोब रद्द करावे.