भाषांतर करण्याचा तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.

तुमचे भाषांतर लयबद्ध आहे असे वाटते; पण मूळ कवितेतल्या यमकांचा विचार करून त्या त्या ठिकाणी भाषांतरामध्ये यमकेही  आणता येतात का ते पाहावे. पहिल्या कडव्यात तुम्ही असा प्रयत्न केल्याचे दिसते. तसेच  संपूर्ण कवितेबाबत करावे असे सुचवावेसे वाटते.

शेवटच्या ओळीत 'अजून' ऐवजी 'आणखी' लिहिले असतेत तर जास्त चांगले वाटले असते.

पुढील भाषांतरासाठी शुभेच्छा.