छंद दोन गोष्टी दर्शवतो : एक, तुम्हाला मूळ साहित्याचा अर्थ संपूर्ण समजला आहे आणि दोन, तुमच्या भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे. काव्य छंदबद्ध नसेल तर मग गद्य आणि पद्य यात फरक काय राहिला? 

मानस उर्दू गझलच रसग्रहण करतो आहे, आपण काही ग़ालिबाची गझल मराठीत सहीसही उतरवू शकणार नाही. आता दोन शक्यता आहेत तुम्ही तुम्हाला भावलेला अर्थ गद्यात लिहा किंवा तितकी तयारी असेल तर ती गझल मराठीत करा. दोन्ही गोष्टीत तितकीच मजा आहे.

प्रशासकीय धोरण मला तरी योग्य वाटते. अर्थात छंदबद्ध नसलेल्या कविता केवळ मराठीत आहेत म्हणून प्रसिद्ध करणे रसिकतेला अनुसरून नाही हे पण तितकेच खरे आणि त्याचा प्रशासकीय धोरण म्हणून विचार केला तर कविता विभागात नक्की विधायक बदल होईल.

संजय