प्रेमभावनेच्या अनिरुद्धतेचा दमदार पुरस्कार करणारा वारिस शाह पंजाबात निर्माण झाला.
त्याने हीर-रांझा यांच्या प्रेमकथेतील वैफल्याला पुन्हा सामाजिक न्यायास सन्मुख केले.

मात्र, फाळणीच्या गदारोळात ज्या असंख्य लोकांना अपरंपार दुःखे सोसावी लागली
त्यांच्या दुःखभावनांना सामाजिक न्यायास सन्मुख करणारा वारिस शाह पुन्हा कुठून आणायचा?

या मागणीचा आर्त टाहो, अमृता प्रीतम यांनी आपल्या काव्यात सशक्तपणे सादर केलेला आहे.
अरुंधती, त्या अर्थाने तुमचा अनुवादही ती आर्तता मराठीत आणण्यात सफळ झाला आहे असे मला वाटते.
त्याखातर मनःपूर्वक अभिनंदन.

तीव्र भावनेस सशक्त उच्चार मिळवून देण्याकरता वापरलेले शब्द म्हणजेच कविता.
तिचा उद्देश भावनांची तीव्रता तेवढ्याच सशक्त अभिव्यक्तीने सुहृदांपर्यंत पोहोचवणे.
कवितेवर छंदबद्धतेचेच काय, पण भाषा व धर्मांचीही बंधने व्यर्थ आहेत.

इथे आपण मूळ पंजाबी शब्द दिलेत आणि प्रशासनानेही धोरणास मुरड घालून ते शब्द इथे ठेवून घेतलेत
याखातर मी तुम्हा दोघांसही हार्दिक धन्यवाद आणि शुभेच्छा देत आहे. 

मानवी मनाच्या अभिव्यक्तींना दडपून टाकणारी धोरणेच गैर ठरवावीत याकरताच ना हीर-रांझा सारखी महाकाव्ये जन्म घेतात?
मग ती काव्ये इतर मानवनिर्मित बंधने झुगारून देतील यात नवल ते काय?